अंथरुणात लघूशंका केल्याने वडिलांनी दिले मुलाला चटके

November 13, 2013 10:23 AM0 commentsViews: 170
pune13 नोव्हेंबर : अंथरुणात लघूशंका करतो म्हणून पुण्यात वडिलांनी मुलाला चटके देऊन त्याला  घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आळा आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या मुलाची घरातून सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी विजय गुप्ता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील लोहगाव परिसरात विजय गुप्ता आणि त्याचे कुटुंबीय राहतात. विजयचा पाच वर्षाचा मुलगा गोलू याला रात्री झोपेत अंथरुणात लघूशंका करण्याची सवय होती. यावरुन विजय त्याला वारंवार ओरडायचा. काही दिवसांपूर्वी गोलूने झोपेत पुन्हा लघूशंका केली. यामुळे विजयचा पारा चढला आणि त्याने गोलूच्या हातापायावर चटके दिले.

 

यावरच न थांबता विजयने त्याला गेल्या दोन-तीन दिवसांपासून घरात डांबून ठेवले होते. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिकांनी गोलूची घरातून सुटका करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेनंतर विजय घरातून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

close