लतादीदींविरोधात काँग्रेसने लावला पुन्हा ‘सूर’

November 13, 2013 4:08 PM4 commentsViews: 32

chadurkar on lata didi“ज्या ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन केलंय, त्यांनी मिळालेले पद्मश्री, पद्म विभूषण असे सन्मान स्वत:हून परत करावेत अशी वादग्रस्त मागणी चांदूरकर यांनी लता मंगेशकर यांचं नाव न घेता केली.”

13 नोव्हेंबर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यामुळे काँग्रेसने लतादीदींना टार्गेट केलंय. आता या वादात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय.

ज्या ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन केलंय, त्यांनी मिळालेले पद्मश्री, पद्म विभूषण असे सन्मान स्वत:हून परत करावेत अशी वादग्रस्त मागणी चांदूरकर यांनी लता मंगेशकर यांचं नाव न घेता केली. जर अशा लोकांनी हे सन्मान स्वत:हून परत केले नाहीत, तर सरकारनं ते परत घ्यावेत अशी सुचनाही चांदूरकर यांनी केलीय.

एवढच नाही तर त्यांनी पुरस्कार परत केले नाही तर मुंबई काँग्रेस त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशाराही चांदूरकर यांनी दिलाय. मंगळवारी मुंबईत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका वादग्रस्त मांडलीय. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी लतादीदींनी नरेंद्र मोदीं हे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर चांदूरकरांनी नाव न घेता लता मंगेशकरांवर टीका केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

 • Sachin Nalawade

  Maharashtracha Digvijay ahey Chandurkar

 • Bhagwan Kade

  चांदुरकर साहेब …..कोंबड कितीही झाकल तरी ओरडायचे राहत नाही , म्हणजे मोदींना कितीही टार्गेट केले तरी मोदीच PM होणार

 • sachin

  Bharat ratna congress party det nahi. Bharat sarkar dete. Te kahi gandhi family chya gharachya paishatun dile jat nahi. chandurkar..

 • pravin

  chandurkar saheb, Latadidichi mafi maga nahitar janata tumhala yache uttar election chya velesh nakkich denar.

close