‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याबद्दल CBI प्रमुखांनी मागितली माफी

November 13, 2013 2:19 PM0 commentsViews: 42

cbi chif13 नोव्हेंबर : बलात्कार रोखता येत नसतील तर तो एन्जॉय करावा असं वादग्रस्त व्यक्तव्य करणारे सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा यांनी आता माफी मागितली आहे.

आपल्या व्यक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे सिन्हा यांनी सारवासारव करत माफी मागितलीय. आपल्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता असं सिन्हा यांचं म्हणणं आहे.

मंगळवारी सीबीआयच्या परिषदेत बोलताना सिन्हा यांनी खेळांमध्ये होत असलेल्या बेटिंगवर नियंत्रण ठेवणं अवघड असल्याचं म्हणलं होतं. ज्याप्रमाणे बलात्कार रोखता येत नसतील तर तो एन्जॉय करावा.

तसंच बेटिंगलाही कायदेशीर मान्यता दिली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य सिन्हा यांनी केलं होतं. सिन्हा यांच्या वक्तव्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रीय महिला आयोगानं सिन्हा यांच्या राजिनाम्याची मागणी केलीय आणि आयोगातर्फे नोटीसही बजावण्यात येणार आहे.

close