सारेगमप स्पर्धेची महाअंतिम फेरी

February 8, 2009 9:01 AM0 commentsViews: 51

8 फेब्रुवारी , मुंबईसारेगामापा लिटिल चॅम्प्स महाअंतिम फेरीला थोडयाच वेळात सुरुवात होईल. गोरेगावच्या एसआरपीएफ ग्राउंडवर ही महाअंतिम फेरी होतेय. मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहित, प्रथमेश या पाचही जणांमध्ये अटीतटीचा सामना आहे. सगळ्यांनाच वाटतंय की या पाचही जणांना विजेते म्हणून घोषित करावं.. या शोसाठी सारेगामापामध्ये भाग घेतलेले 50 लिटिल चॅम्प्स तर येणार आहेतच. पण याशिवाय प्रत्येक फायनलिस्टच्या गावातले त्यांचे मित्रमैत्रिणसुध्दा हा ग्रँड फिनाले पाहायला येणार आहेत. हा कार्यक्रम पहाण्यासाठी अनेकांनी आपले प्लॅन्ससुध्दा बदलले आहेत.

close