राज्यात वाघोबांची संख्या वाढली

November 13, 2013 1:40 PM0 commentsViews: 27

Image img_91542_tiger_240x180.jpg13 नोव्हेंबर : देशभरात वाघाची संख्या कमी झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती मात्र एका वर्षानंतर ‘सेव्ह द टायगर’ या मोहीमेला यश आलंय. महाराष्ट्रात वाघांची वाढली. राज्यातल्या वाघांची संख्या 160 वरुन 200 वर गेलीय, असं वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी सांगितलंय.

या वर्षीच्या गणनेवरून ही ताजी आकडेवारी वनमंत्र्यांनी जाहीर केलीय. वाघांचं वास्तव्य असणार्‍या अभयारण्याजवळ 17 गावांचं पुनर्वसन करण्यात आलंय. जंगलाची प्रत्येक झाडाची नोंद घेणारं यंत्र प्रत्येक वनरक्षकाला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर
वनक्षेत्राचे नकाशे नव्यानं तयार करण्यात येत आहे.

यासाठी 1 वर्षाचा अवधी लागणार आहे. सांगलीत कुंडल इथं वन कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणारी फॉरेस्ट ऍकॅडमी मंजूर करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातली चौथी ऍकॅडमी असणार आहे.

close