ही तर बौद्धिक दिवाळखोरी -फडणवीस

November 13, 2013 7:19 PM4 commentsViews: 29

13 नोव्हेंबर : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस लोकशाहीला मानतो की नाही असा खरमरीत सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तसंच लतादीदी देशातल्या नाही तर जगातल्या मोठ्या गायिका आहेत त्यांना लोकशाही पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचा तो अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असंही फडणवीस म्हणाले. चांदूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. ज्या ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन केलंय, त्यांना मिळालेले पद्मश्री, पद्म विभूषण असे सन्मान स्वत:हून परत करावेत अशी वादग्रस्त मागणी चांदूरकर यांनी लता मंगेशकर यांचं नाव न घेता केली. जर अशा लोकांनी हे सन्मान स्वत:हून परत केले नाहीत, तर सरकारनं ते परत घ्यावेत अशी सुचनाही चांदुरकर यांनी केलीय. तसंच त्यांनी पुरस्कार परत केले नाही तर मुंबई काँग्रेस त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशाराही चांदुरकर यांनी दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. चांदूरकर यांच्या वक्तव्याची काँग्रेसने दखल घेतलीय. लतादीदींना आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी कुणाला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणं ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे. त्यावर जर कुणी पद्म पूरस्कार परत घेण्याची भाषा करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी चांदूरकर यांना फटाकरले. या अगोदरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लतादीदींवर टीका केली होती.

 • ARVIND PUJARI

  phadanvisanchya matashi purna pane sahamat ahe bharat ratna kahi congress ne dila nahi latadidinchya sangit yodanacha to gourav ahe. congress ne ashi faltu badbad karu naye.

 • namuchi

  चंदन मित्रा, अमर्त्य सेन यांच्या बाबत बोलला तेव्हा दिवाळखोरी नव्हती का?…, चांदूरकरांनी हे वक्तव्य मुद्दामच केले आहे जेणेकरून तुमचा दुपट्टीपणा लोकांना कळेल…अरे ह्यला कोणी केला रे प्रदेश अध्यक्ष…

  • Sanjay

   Khup chhan,

   Tumchi divalkhori yavarun disun yete
   mhane muddamch kele

   • namuchi

    अरे माठ्या हा आरोप तुझ्या वर कि करता येईल … त्या दिवाळखोर चंदन मित्रा आणि भाजपच्या पोपटा बाबत बोल…ह्या फडणवीस बरोबर त्याला प्रदेश अध्यक्ष करणाऱ्या दहशतवादी rss ची हि बौद्धिक दिवाळखोरी आहे…ibn लोकमत धन्यवाद तुम्ही माझी पहिली प्रतिक्रिया publish केली आणि त्यातली आक्षेपहार शब्द काढून टाकलेत..त्याबद्दल तक्रार नाही पण हीच तत्परता कॉंग्रेस आणि विशेषता दिग्विजयसिंग आणि दैत्य मोडी विरोधात वक्तव्य करणार्याबाबत आक्षेपहार मजकूर असल्यास दाखवावी हि माफक अपेक्षा…. पुन्हा एकदा धन्यवाद

close