सदानंद मोरेंना धमकीची गृह खात्याने दखल घ्यावी -आव्हाड

November 13, 2013 9:02 PM0 commentsViews: 37

jitendra awadha13 नोव्हेंबर : इतिहासकार सदानंद मोरे यांना आलेल्या धमकीची राज्याच्या गृह खात्याने गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीये.

सदानंद मोरे यांनी आयबीएन लोकमतच्या ‘पोलादी सत्य’ या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरून जो वाद सुरू आहे, त्याबद्दची इतिहासातली तथ्यं सांगितली होती. त्यानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय.

दाभोलकर यांनाही अशाच पद्धतीने आधी फॅसिस्ट प्रवृत्तींनी धमकी दिली, त्यामुळे अशा धमक्यांकडे गांभिर्यानेच पाहायला हवं आणि धमकी देणार्‍यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशीही मागणी आव्हाडांनी केलीये.

close