‘वानखेडे’च्या पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचं नाव

November 13, 2013 7:27 PM0 commentsViews: 33

Image img_222432_balasahebthakarehelth_240x180.jpg13 नोव्हेंबर : वानखेडे स्टेडियमच्या पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचेअध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

आता संपूर्ण वातानुकुलीत पत्रकार कक्षातून पत्रकारांना सामन्याचं कव्हरेज करता येणार आहे. दैनिक सामनामधून मात्र या नामकरण प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता.

एखाद्या पत्रकार कक्षाला नाव देण्याऐवजी कोणत्यातरी भव्य वास्तूला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी भूमिका सामनातून मांडण्यात आली होती. त्यामुळं आजच्या या सोहळ्याला अनेक शिवसेना नेत्यांची अनुउपस्थिती चर्चेचा विषय होती.

close