श्रीलंकेचा 68 रन्सनी विजय

February 8, 2009 12:22 PM0 commentsViews: 2

8 फेब्रुवारी , कोलंबो श्रीलंकन दौर्‍याच्या शेवटच्या वन-डेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं ठेवलेल्या 321 रन्सचा पाठलाग करताना भारताचे सर्व बॅटसमन केवळ 252 रन्सवर आऊट झाले. 25 ओव्हरमध्येच दीडशे रन्सच्या आतच भारताने सहा विकेट गमावल्या होत्या. इनिंगच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये थुषारानं सेहवागला आऊट करत भारताला पहिला झटका दिला. या धक्यातून सावरण्यापूर्वीच रैनाही झटपट आऊट झाला. गंभीर आणि युवराजनं डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण पुन्हा कुलसेखरानं ही जोडी फोडली. गंभीर 13 रन्सवर आऊट झाला. युवराजने 73 रन्सची एकाकी झुंज देत श्रीलंकन बॉलर्सना चकवलं. त्यात धोणीनंही आक्रमक खेळत 53 रन्स ठोकले. नवोदित जडेजा 60 रन्सवर नाबाद राहिला. त्यापूर्वी ओपनर दिलशाननं श्रीलंकेला शानदार सुरुवात करून दिली.त्याची सेंच्युरी तीन रन्सनी हुकली. कुमार संगकाराबरोबर त्याने दुसर्‍या विकेटसाठी 143 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. भारतानं पाच सामन्यांच्या या सीरिजमध्ये 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.मॅन ऑफ द मॅच कुमार संगकाराला तर मॅन ऑफ द सीरिज युवराज सिंगला देण्यात आलं.

close