तटकरे-जाधव यांच्यातला संघर्ष पुन्हा उफाळला

November 14, 2013 1:39 PM0 commentsViews: 55

bhaskar jadhav vs tatkare14 नोव्हेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं पार पडलेल्या गडनदी धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झालाय.

या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत आपण गुहागरचे आमदार असूनही आपलं नाव टाकण्यात आलं नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यांवर केलाय. त्याचवेळी तटकरे यांनी पक्षवाढीसाठी कुठलाच प्रयत्न केला नाही. त्यांनी पक्ष केवळ घरातच वाढवला असा थेट हल्ला भास्कर जाधव यांनी चढवला.

या जाधव-तटकरे वादाची दखल आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांनी घेतलीय. यासंदर्भात पवार लवकरच एक बैठक बोलावणार असून या दोन्ही नेत्यांची कान उघाडणी करणार आहेत. दरम्यान, जाहिरात आणि निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार भास्कर जाधव यांचं नाव छापण्याचं टाळून सुनील तटकरे यांच्या जलसंपदा खात्यानं चूक केली. अशी कबुली राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

close