मोदींवर महाराष्ट्रातल्या निवडणुकीची धुरा

February 8, 2009 2:23 PM0 commentsViews: 2

8 फेब्रुवारी, नागपूरप्रशांत कोरटकर भाजपच्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीयअधिवेशनाचं सूप अखेर वाजलं. शेवटच्या दिवशी लालकृष्ण आडवाणी यांनी पार्टी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी जोमात कामाला लागण्याचा मंत्र दिला. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराची जवाबदारी नरेंद्र मोदीकडे अडवाणींनी सोपवली आहे. भाजपच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी मंचावर बोलायला आले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा भाजपला घ्यायचाय. म्हणूनच मोदींवर महाराष्ट्र आणि गुजरातसह गोव्याची जवाबदारी सोपवण्यात आलीय. " आम्ही मोदींची निवड योग्यच केली आहे. मोदींचा महाराष्ट्रात असणारा चाहतावर्ग लोकसभा निवडणुकीसाठी क्रांती घडवून आणेल, " असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मोदींच्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर दिलीत तर मी इथला कारभार सुरळित करून दाखवेन, असं मोदी म्हणाले होते. त्याची दखल घेत पक्षानं त्यांच्यावर निवडणुकीचा कारभार सोपवलाय. शिवसेनेनं कर्नाटक मुद्यावर भाजपशी युती तोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेला शह देण्यासाठीच मोदींची निवड केली असावी, अशी चर्चा आहे. मोदी-मुंडे जोडी येत्या आगामी लोकसभानिवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार घडणार. कारण ते विनर आहेत, " असं भाजपचे प्रवक्ता प्रकाश जावडेकर म्हणाले. याआधी महाजन-मुंडे ही जोडी महाराष्ट्रातल्या निवडणुकीची धुरा सांभाळत होती. पण आता मोदी-मुंडे हे समीकरण भाजपला वापरायचं आहे.

close