रायगडमध्ये साथीच्या आजारांचं थैमान, 14 जणांचा मृत्यू

November 14, 2013 12:10 PM0 commentsViews: 32

raigad14 नोव्हेंबर : रायगड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांत लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, आणि हिवतापाची साथ आलीये. त्यामुळे गेल्या 2 आठवड्यांच्या कालावधीत 14 जण दगावले आहेत.

त्यातच तापाचं निदान होण्यासाठी आवश्यक असलेली सक्षम व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. या विचित्र आजाराबाबत जिल्हा प्रशासनाजवळ विचारणा केली असता त्यांनी तापाची साथ असल्याचं मान्य केलं.

14 जणांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू लेप्टोस्पायरोसीसमुळे झाला असल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलीय. तसंच ही साथ आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसलीय. स्थानिक अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. तसंच पुण्यातलं विशेष पथक रुग्णालय आणि परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालीय. त्यांनी रक्ताचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवले.

close