सेहवाग, भज्जीला ‘अ’ श्रेणीतून वगळलं

November 14, 2013 8:52 PM1 commentViews: 70

zahir shewagh bhaji14 नोव्हेंबर : एकीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या 200 व्या कसोटीला सुरूवात झालीय. सचिनला अख्खं जग निरोप देतंय पण  सचिनच्या खांद्याला खांदा लावून खेळणार्‍या वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आण झहीर खानबाबत धक्का देणारी बातमी आहे.

2013 – 2014 या हंगामासाठी भारतीय खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर करण्यात आलीय. ‘अ’ श्रेणीतून भारताचे सीनिअर खेळाडू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि झहीर खानला वगळण्यात आलंय. यामुळे तीनही खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

टेस्ट कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणार्‍या सचिन तेंडुलकरचा मात्र अजूनही अ श्रेणीत समावेश आहे. तर युवराज सिंग आणि गौतम गंभीरचीही ब श्रेणीत घसरण झालीय. भारताचा युवा बॅट्समन सुरेश रैनाला ‘अ’श्रेणीत स्थान देण्यात आलंय. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वर्किंग कमिटीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

  • योगेश विलास शिंदे

    नमस्कार,
    सचिन आणि लारा यांच्या नावाने नवी मालिका सुरू करून यांना मानाचा मुजरा करावा.

close