भाजपचा गांधीवादाला रामराम

February 8, 2009 2:29 PM0 commentsViews: 2

8 फेब्रुवारी, नागपूरभाजपनं नागपुरातल्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशानात पुन्हा एकदा यु-टर्न घेतलाय. गांधीवादावरून भाजप पुन्हा राममंदिराकडे वळलीय. या सगळ्यातून हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर येती निवडणूक लढवण्याचे भाजपचे संकेत स्पष्ट दिसतायत. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपनं गांधी विचारांच्या मॉडेलनं विकास होईल असं म्हटलं होतं. पक्षाच्या या भूमिकेवर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण लगेचच दुसर्‍या दिवशी भाजप आपल्या मूळ भूमिकेवर गेला आणि भाजपला राममंदिराची आठवण झाली. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी राममंदिर बांधूच असा संकल्प या अधिवेशनात सोडला, तर अडवाणींनीही याला आज पुष्टी दिली. " भाजपनं नुकत्याच मध्यप्रदेश छत्तीसगढच्या निवडणुका जिंकल्यायत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका लढणार, " भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले. दरम्यान भाजपची ही भूमिका गंभीर असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलीय.

close