लवकरच INS विक्रमादित्य युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात

November 14, 2013 9:23 PM0 commentsViews: 69

14 नोव्हेंबर : भारतीय नौदलाची ताकत वाढवणारी आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात तैनात होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी रशियाच्या सेवमॅश शिपयार्डमध्ये रशियाकडून भारताच्या ताब्यात देण्याचा कार्यक्रम होणार आहे. उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन आणि संरक्षण मंत्री यांच्या हस्ते भारताचे संरक्षण मंत्री ए.के.ऍटनी आणि नौदल प्रमुख डी.के.जोशी यांना ही युद्धनौका भारताचे प्रतिनिधी म्हणून सुपूर्द करणार आहे. INS विक्रमादित्य युद्धनौकेचं वजन 44 हजार 500 टन आहे. तर लांबी 284 मीटर आहे. या अवाढव्य युद्धनौकेसाठी भारतीय नौदल तळांवर विषेश गोदी देखिल बणवण्यात आलीय. खोल समुद्रात ही युद्धनौका ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करु शकते. या युद्धनौकेवर भारताचे सर्व चॉपर्स तसेच मीग विमानं देखिल राहु शकणार आहेत. त्यामुळे आता हिंदी महासागरात भारतीय नौदल अधीक सक्षम होणार आहे.

close