पुण्याच्या गायत्रीने रेखाटलेलं ‘डुडल”गुगल’वर

November 14, 2013 9:39 PM0 commentsViews: 200

14 नोव्हेंबर : जगभरातील नेटिझन्सना प्रिय असलेल्या गुगल होमपेजवर पुण्याच्या शालेय विद्यार्थिनीनं आपलं नाव झळकावलंय. गुगल मीडियातर्फे घेण्यात आलेल्या ‘डुडल फॉर इंडिया’या स्पर्धेत गायत्री केथरमन अव्वल ठरलीय. बिशप स्कुलमधे 9 व्या वर्गात शिकणार्‍या गायत्रीनं बालदिनानिमित्त आयोजित स्पर्धेत भाग घेतला. ‘सेलिब्रेटिंग इंडियन वूमन’ या विषयावर ही स्पर्धा होती. संपूर्ण देशातून 1500 शाळांमधून दीड लाख विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. गायत्रीनं यात बाजी मारली. 14 नोव्हेंबरला दिवसभर गुगल इंडिया पेजवर हे डुडल झळकतंय. भारतीय स्त्रीचं वेगळेपण या डुडलमधून दाखवण्याचा प्रयत्न गायत्रीनं केलाय.

close