बाळासाहेबांच्या कायमस्वरुपी स्मारकाचा तिढा अजूनही कायम

November 14, 2013 10:52 PM0 commentsViews: 22

14 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतिदिन 17 नोव्हेंबर रोजी आहे. शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांच्या मातीच्या स्मृती चौथर्‍याचं काम पूर्ण झालंय. पण मुंबईत त्यांचं कायमस्वरुपी स्मारक कधी होणार हा गुंता मात्र अजून सुटलेला नाहीय. शिवसेनेनं कायमस्वरुपी स्मारकासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेत. पण कायम स्वरुपी स्मारकाचा प्रश्न अजूनही अंधारातच आहे. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कारनंतर शिवसेनेनं दुसर्‍याच दिवशी बाळासाहेबांचं स्मारक होईल तर शिवाजी पार्कवरच होईल अशी घोषणा केली होती. मात्र सरकारच्या दबावनंतर सेनेला शिवाजी पार्क सोडावे लागले. मात्र स्मारकाच्या मागणीसाठी सेनेनं वारंवार मागणी केली. बाळासाहेबांचा स्मारक महापौर बंगल्यात, महालक्ष्मी रेसकोर्सवर उभारावे अशी चर्चाही झाली पण यावर काहीही निर्णय झाला नाही. अलीकडेच बाळासाहेबांच्या स्मारकाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत बाळासाहेब असते आणि त्यांना प्रबोधनकारांचं स्मारक करायचं असतं तर त्यांनी सरकार पाडलं असतं असं जाहीर व्यक्तव्य केलं होतं. मात्र जोशींना या वक्तव्यामुळे दसरा मेळाव्यात अपमानीत व्हावं लागलं. मात्र उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी जोशींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांचं पहिला स्मृती दिन आहे. वर्ष उलटले तरी अजूनही कायस्वरुपी स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

कायमस्वरूपी स्मारक कधी ?

– स्मारकाच्या जागेसाठी शिवसेनेकडून जागांची चाचपणी
– स्मारकाचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेकडून ट्रस्टची स्थापना
– ट्रस्टमध्ये ठाकरे कुटुंबीयांसोबत इतर शिवसेना नेत्यांचाही समावेश
– स्मारकासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट
– स्मारकाला मनसेचा विरोध
– लोकोपयोगी प्रकल्पाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मनसेची मागणी
– मात्र सध्या तरी शिवसेनेचं स्मारकाबाबत मौन

close