काँग्रेसचा पराभव काँग्रेसचेच लोक करतायत – सोनिया गांधी

February 8, 2009 2:33 PM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी काँग्रेसचा पराभव काँग्रेसचेच लोक करतायत, अशी कबुली सोनिया गांधी यांनी दिली आहे. पक्षांतर्गत वाद विसरण्याचं जाहीर आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. काँग्रेसच्या देशातभरातील जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक काँग्रेसने आज राजधानी दिल्लीत आयोजित केली होती. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. त्याचबरोबर राज्यातली जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधीही या बैठकीला हजर होते. याच बैठकीत सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळही फोडला. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे 30 टक्क्यांपेक्षा जास्त तिकिटं ही तरूण उमेदवारांना दिली जाणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत ही माहिती दिलीये.असं असलं तरी नेत्यांच्या मुलांनाच हा तिकिटं दिली जातील, अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांनाच वाटतेय.लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात राष्ट्रवादी अडवणूक करणार नाही. प्रसंगी कमी जागा मिळाल्या तरी हरकत नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर भर देणाचं आवाहन पवार यांनी केलंय. पुण्यात महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशनच्या सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तर जागावाटपाचा प्रश्न चर्चेनंतरच सोडवण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.

close