इगतपुरीजवळ मंगला एक्स्प्रेस घसरली, 5 ठार

November 15, 2013 9:20 AM2 commentsViews: 80

mangala express15 नोव्हेंबर :नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी घोटीजवळ दिल्लीहून एर्नाकुलमला जाणार्‍या मंगला एक्स्प्रेस रुळावरुन घसरून अपघात झालाय.या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झालेततर आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. या अपघातामध्ये 49 जण जखमी झालेत. त्यापैकी 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

7 गंभीर जखमींवर नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर जखमींवर घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मदतकार्य अजूनही सुरू आहे. सतबीर सिंग आणि राहुल शुक्ला यांचा या अपघातात बळी गेलाय. आज पहाटे हा अपघात झालाय.अपघातस्थळी मनमाड जंक्शन वरुन ब्रेकडाऊन ट्रेन घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

त्याचबरोबर डॉक्टरांचं आणि रेल्वे गँगमनचं मोठं पथक घटनास्थळी पोहचलंय. मदत कार्याकरता एकूण 40 जणांचं पथक घटनास्थळाकडे रवाना झालंय. नक्की इंजिन मधील बिघाडामुळे हा अपघात झाला आहे की रेल्वे ट्रॅक उखडल्यामुळे हा अपघात झाला आहे हे काही कळु शकले नाही.हा अपघात इतका भीषण होता की, मंगला एक्स्प्रेसचे 9 डबे एकमेकांवर वेगाने आदळलेत. यात एका डब्याचा चक्काचुर झालाय. तर 9 डब्बे एकमेकांवर चढले आहे. या अपघातामुळे नाशिककडुन मुंबईकडे येणार्‍या राज्यराणी एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईकडे येणार्‍या सगळ्या गाड्याचं वेळापत्रक कोलमोडलंय.

  • Anil Bhavale

    Bahot Danger ho gaya..

  • Sachin J

    This is not good god

close