शिवानंद टाकसाळेंची तडकाफडकी बदली

November 15, 2013 9:07 AM0 commentsViews: 47

beed bank15 नोव्हेंबर : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक म्हणून दोन वर्षांपूर्वी पदभार घेतलेले शिवानंद टाकसाळे यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून त्यांच्याजागी सहकार आयुक्ती बी.बी.मुकणे यांच्याकडे एकतर्फी पदभार सोपवण्यात आलाय.

गुरुवारी रात्री मुकणे यांनी हा पदभार स्विकारला. टाकसाळे यांनी मोठमोठ्या पुढार्‍यांवर केलेल्या फौजदारी स्वरुपाच्या कारवाई केल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. टाकसाळे यांनी 2011 मध्ये पदभार स्विकारल्यापासून बँकेच्या थकित कर्जापैकी अडीचशे कोटींची थकबाकी वसूल केलीय.

अजून अनेक राजकीय नेत्यांसह, पतसंस्था मिळुन एकूण 100 कोटींचं येणं बाकी आहे टाकसाळे यांच्याकडेच पुन्हा एकदा बॅंकेचा पदभार देण्यात यावा याकरता ठेवीदार तसंच बीड जिल्ह्यातल्या सेवाभावी संघटना या एकत्र येणार असून जिल्हाधिकारी सुनील केंद्रेंकर यांच्याकडे यासंदर्भात मागणी करणार आहेत.

close