राज ठाकरेंवर पुन्हा समन्स

February 8, 2009 2:52 PM0 commentsViews: 4

8 फेब्रुवारी, औरंगाबाद चिथावणीखोर भाषण करून कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यास भाग पाडणार्‍या राज ठाकरे यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेयत. औरंगाबाद आणि वैजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी हे आदेश बजावलेयत. राज ठाकरेंवर मराठवाड्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 35 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. वैजापूर आणि औरंगाबाद येथे दगडफेक करणार्‍या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्याविरूध्दही गुन्हे नोंदवण्यात आले होते, त्यानुसार औरंगाबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी 10 मार्च आणि वैजापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी 19 मार्चला जामीनासाठी राज ठाकरेंवर प्रत्यक्ष हजर राहण्याचं समन्स बजावलंय. राजकीय दौर्‍यात व्यस्त असल्यामुळे राज ठाकरे यापूर्वी प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. पुढील तारखेला ते हजर राहतील असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलंय.

close