‘तसं’ मी बोललोच नव्हतो -चांदूरकर

November 15, 2013 1:33 PM5 commentsViews: 63

15 नोव्हेंबर : मी लतादीदींबद्दल बोललोच नव्हतो, मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी जर तसं बोललो असतो तर मी माफी मागितली असती असं स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी दिलं. चांदूरकर यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला असं सांगत माध्यमांवरच खापर फोडलं. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात चांदूरकर यांनी, ज्या ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन केलंय, त्यांनी त्यांना मिळालेले पद्म पुरस्कार स्वत:हून परत करावेत, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या विधानावर वाद निर्माण झाल्यामुळे अखेर चांदूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण, त्यांनी मात्र आपण लतादीदींना काहीही म्हणालो नाही, असं स्पष्टीकरणही दिलंय. चांदूरकर यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

 • deepa

  हा पुरस्कार त्यांच्या स्वतःच्या मालकीचा नाही

 • Sachin Nalawade

  Lokana kai yede samazata ka Chandurkar

 • Sachin Jadhav

  hushari karu naka chandurkar

 • PAWAR R M

  CHANDURKAR IT IS WRONG

 • Sham Dhumal

  मोदी जिंकणार आणि भ्रष्ट सरकार सत्तेतून हद्दपार होणार याची कॉंन्ग्रेसला खात्री
  झाली आहे. हे ह्या नेत्यांच्या बोलण्यातूनच स्पष्ट होत आहे.
  याला म्हणतात पोटदुखी (दुसर्‍याचे चांगले झालेले बघवत नाही)
  बोलणार्‍याच्या पायाखालची वाळू सरकतेय. हो ना चांदूरकर?

close