मुंबई हल्ल्याचा कट शिजला युरोपात

February 8, 2009 4:18 PM0 commentsViews: 6

8 फेब्रुवारी, पाकिस्तान पाकिस्ताननं मुंबई हल्ल्याप्रकरणी चौकशी अहवाल तयार केलाय. जिओ टीव्हीनं दिलेल्या बातमीनुसार मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तान किंवा भारतात शिजला नव्हता, असं अहवालात म्हटलंय. हा कट युरोपातल्या एखाद्या देशात शिजल्याचं पाकचा हा अहवाल सांगतो. मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी कसाबला आपल्या ताब्यात देण्याची मागणीही पाकिस्तान करण्याची शक्यता आहे, असं जीओ टीव्हीनं म्हटलंय. कसाब आणि इतर आरोपींविरोधात पाकिस्तान स्वतः गुन्हे दाखल करण्याच्या विचारत असल्याचं समजतं. दरम्यान हा अहवाल उद्या डिफेन्स को-ऑर्डिनेट कमिटीसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया दिली जाईल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलंय.

close