फ्रायडे रिलीज: ‘रामलीला’,’रज्जो’ सिनेमागृहात

November 15, 2013 5:36 PM0 commentsViews: 167

11 नोव्हेंबर : सध्या सगळीकडे ‘सचिन’मय वातावरण आहे, पण आपला लाडका सचिन आऊट झाल्याने या सगळ्या क्रिकेटप्रेमीं निराशा झाली आहे. अशा वेळी क्रिकेट स्टेडियमवरच्या गर्दीला दिलासा देणारे दोन हिंदी आणि एका मराठी चित्रपटाचा चांगला पर्याय आज फ्रायडे रिलीज मध्ये उपलब्ध आहेत.

 

त्यामध्ये पहिला आहे दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा ‘रामलीला’. गेल्या कही दिवासांपासून या चित्रपटाच्या नावावरुन मोठा वाद सुरू होता त्यामुळे चित्रपटाच्या रिलीज होण्याची तारीख पुढे ढकलण्याची अफवा पसरली होती पण अखेर हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. ही एक लव्हस्टोरी असून या चित्रपटात भव्य सेटवर रंगाची उधळण असण्याबरोबरच दीपिका पदुकोण आणि रणबीर सिंग या जोडीचा अभिनय पाहायला मिळणार आहे. तर दुसरी कडे कंगना राणावतचा ‘रज्जो’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. मुजरा करणार्‍या तरुणीची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.महेश मांजरेकरची या चित्रपटात वेगळी भूमिका आहे.हा चित्रपट या दृष्टीनेही वेगळा आहे कारण लेखक विश्वास पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पहिल्यांदाच त्यांनी दिग्दर्शन केलंय.

 

तर मराठीत आज ‘तेंडुलकर आऊट’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘तेंडुलकर आऊट’ ही एक ब्लॅक कॉमेडी आहे. संतोष जुवेकर, सयाजी शिंदे,सई ताम्हणकर या कलाकारांची एक वेगळी जुगलबंदी या सिनेमातून बघायला मिळणार आहे.

close