कार्तिकी लिटील चॅम्प्सची महाविजेती

February 9, 2009 4:33 AM0 commentsViews: 128

9 फेब्रुवारी मुंबईसारेगमप लिटील चॅम्प्सच्या महाअंतिम फेरीत आळंदीची कार्तिकी गायकवाड महाविजेती ठरली. मुंबई झालेल्या महाअंतिम फेरीत इतर स्पर्धकांना मागे टाकत ती विजेती ठरली. कार्तिकीवर संगीताचे संस्कार झाले ते तिच्या घरापासून . गेले सहा महिने चाललेल्या या लिटील चॅम्प्स स्पर्धेत कार्तिकीनं खूप कठीण गाणी गायली होती. त्यामुळे कार्तिकीने परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कार्तिकीच्या या विजयानंतर आळंदीत सुध्दा विजयाचं वातावरण होतं. जेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी कार्तिकीच्या नावाची महाविजेती म्हणून घोषणा केली आणि सर्व उपस्थितांनी जल्लोष केला. कार्तिकीला 2 लाख रुपये तर आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे या उपविजेत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच बक्षीस देण्यात आलं. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. देवकी पंडित, आशा खाडिलकर, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, संजीव अभ्यंकर यामान्यवर परीक्षकांची निवड आणि एसएमएसचा कौल याच्या 50-50 टक्के मतांवर कार्तिकीला अंतिम विजेती ठरवण्यात आलं.

close