‘सुयोग’चा आधार हरपला, सुधीर भट यांची एक्झिट

November 16, 2013 9:12 AM0 commentsViews: 129

sudhir bhat16 नोव्हेंबर : मराठी नाट्यसृष्टीतील सुयोग या आघाडीच्या नाट्यसंस्थेचे संस्थापक,ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.ते 61 वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.

सुधीर भट यांच्या निधनाने संपूर्ण मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीर भट यांनी 1985 साली सुयोग ही नाट्यसंस्था स्थापन केली. गेल्या 28 वर्षात 75 हून अधिक नाटकांची त्यांनी यशस्वी नाट्यनिर्मीती केली. त्याचबरोबर 30 हजारांहुन अधिक प्रयोग आणि आपल्या 5 नाटकांचे वैयक्तिक 1000 प्रयोग करणारे ते मराठी रंगभुमीवरील एकमेव नाट्यनिर्माते होते.

मोरूची मावशी , कलम 302 , गांधी विरुद्ध गांधी, एका लग्नाची गोष्ट, प्रेमा तुझा रंग कसा, मित्र ,जादू तेरी नजर,आप्पा आणि बाप्पा, लग्नाची बेडी, व्यक्ती आणि वल्ली, ती फुलराणी, श्री तशी सौ, संध्याछाया, कबड्डी कबड्डी, हिच तर प्रेमाची गंमत आहे, केशवा माधवा अशी त्यांनी निर्मिती केलेली गाजलेली नाटकं. नाट्य निर्माते संघाचे ते दिर्घकाळ अध्यक्ष होते. नुकतंच त्याचं बेईमान हे वसंत कानेटकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं नाटक लवकरच रंगभुमीवर येणार होतं. पण त्याआधीच त्यांनी आपल्यातून एक्झिट घेतली.

सुयोगची गाजलेली नाटकं

 • 1 जानेवारी 1985 ला सुयोगची स्थापना
 • सुयोगची आतापर्यंत 80 हुन अधिक नाटके
 • आप्पा आणि बाप्पा
 • एका लग्नाची गोष्ट
 • चार दिवस प्रेमाचे
 • गांधी विरुद्ध गांधी
 • जावई माझा भला
 • तरुण तुर्क म्हातारे अर्क
 • ती फुलराणी
 • मोरुची मावशी
 • लग्नाची बेडी
 • प्रेमा तुझा रंग कसा
 • भ्रमाचा भोपळा
 • व्यक्ती आणि वल्ली
 • श्री तशी सौ
 • संुदर मी होणार
 • संध्याछाया
 • उडुनी जा पाखरा !
 • दिनूच्या सासूबाई राधाबाई

 

close