पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नवा वाद

February 9, 2009 6:03 AM0 commentsViews: 12

9 फेब्रुवारी औरंगाबादसंजय वरकड अमेरिकेतील सॅनहोजे येथे होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वीच नव्या वादाला तोंड फुटलंय. संमेलनाच्या आयोजकांनी मान्यवर लेखकांना जी निमंत्रण पत्रिका पाठवलीय, त्यातली भाषा वाचून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका हातात पडताच, खरं तर संमेलनाच्या निमंत्रित साहित्यिकांना आनंद वाटायला हवा होता. पण घडलं उलटच. पत्र वाचून साहित्यिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. खुद्द संमेलन अध्यक्षांनाही हे पत्र वाचून मनस्ताप झाला. निमंत्रण तर पाठवलं पण त्यातली भाषा साजेशी नव्हती, सौजन्याची नव्हती. याबाबत प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक रा. रं बोराडे म्हणाले, मला जे पत्र मिळालं त्यातील भाषा सन्मानजनक नाही. ज्या गोष्टी ते करू शकत नाहीत, त्या लिहण्याची गरजच नाही. जे करू शकतात तेवढच सांगितलं पाहिजे. विश्व साहित्य संमेलनाच्या पूर्वीची ही नाराजी. हे म्हणजे नवरी पाटावर बसली आणि जावईबापू रुसले त्यातला प्रकार झाला.पण साहित्य संमेलन म्हटलं की त्याजोडीनं हे आलंच. साहित्यिकांचे रुसवे काढण्यात बे-एरियाच महाराष्ट्र मंडळ कितपत यशस्वी होतंय ते आता पाहायचं.

close