केजरीवालांचा आज उमेदवारी अर्ज दाखल?

November 16, 2013 8:07 AM0 commentsViews: 63

Image img_221832_kejriwal3454_240x180_300x255.jpg16 नोव्हेंबर : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

दिल्लीत आम आदमी पार्टीच्या ऑफीसबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन यांनी तीन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज भरला आहे.

जनलोकपाल आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी स्थापन केली. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निवडणूक सर्व्हेत ‘आम आदमी’ला लोकांनी पसंती दिलीय. सर्व्हेनुसार आम आदमी किंग मेकरची भूमिका बजावणार अशी शक्यता आहे.

close