भारतरत्न सचिन तेंडुलकर

November 16, 2013 11:25 PM3 commentsViews: 227

Sachin-Tendulkar216 नोव्हेंबर : गेली दोन दशक क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज क्रिकेटला अलविदा केला. सचिन निवृत्त झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी दुखात बुडाले पण त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केंद्र सरकारने अनोखी भेट दिली. देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान सचिनला जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

सचिनसोबत रसायन शास्त्रज्ञ सी.एस.आर.राव यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. भारतरत्न मिळालेला हा सचिन पहिला खेळाडू ठरला आहे. सचिनने हा सन्मान आपल्या आईला अर्पण केला असून केंद्र सरकारचे त्याने आभार मानले आहे. याआधीही महाराष्ट्रातल्या सात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यात सचिन हा आठवा महाराष्ट्रीयन ठरला आहे ज्याला हा सन्मान जाहीर झालाय.

संबंध देशात आज पुन्हा दिवाळी साजरी होतेय. जल्लोष व्यक्त करण्यात येतोय. अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती. आज शेवटी कोट्यावधी भारतीयांची इच्छा पूर्ण झालीय. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी सचिनचं अभिनंदन केलंय.

भारतरत्न पुरस्काराची महाराष्ट्रातली परंपरा..

भारतामध्ये स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न देण्यात आलं. प्राच्य विद्या संशोधक आणि हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहिणारे संस्कृत अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांना 1963 साली हा पुरस्कार देण्यात आला. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे हे 1983 साली या पुरस्काराचे मानकरी ठरले. 1990 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलं. जे. आर. डी. टाटा हे भारतरत्न या पुरस्काराचे महाराष्ट्रातले पाचवे मानकरी. त्यांना 1992 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2008 साली भीमसेन जोशींना हा बहुमान मिळाला. आणि आता 2013 ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय.

‘भारतरत्न’ने सन्मानित

महर्षी धोंडो केशव कर्वे 1958
पांडुरंग वामन काणे 1963
आचार्य विनोबा भावे 1983
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1990
जे. आर. डी. टाटा 1992
लता मंगेशकर 2001
भीमसेन जोशी 2008
सचिन तेंडुलकर 2013

  • Ashok Gaitonde

    sachinchya cricket karkirdit tala manacha bindu BHARAT RATNA CONGRATS SACHIN U DESERVED FOR IT I

  • PAWAR R M

    Bharat Ratna etkyat nahi dila java

  • Jayant

    Right time to honour “Bharat Ratna”.

close