ज्येष्ठ वैज्ञानिक सी.एन.आर.राव यांना भारतरत्न

November 16, 2013 8:13 PM0 commentsViews: 59

16 नोव्हेंबर : आज सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झालं पण आणखी एक ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञाचा याच पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव असं त्यांचं नाव आहे.. सी.एन.आर राव हे रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 30 जुन 1934 कर्नाटकाच्या बंगळूर मध्ये झाला. घन स्थिती आणि संरचनात्मक ररसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. सध्या ते पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. 79 वर्षांच्या राव यांनी त्यांच्या पाच दशकांच्या कार्यकाळात तब्बल 45 पुस्तकं आणि 1500 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत.कानपूर आयआयटी आणि बंगरुळू मधल्या भारतीय विज्ञान संस्थेत त्यांनी प्राध्यापकाचं काम केलंय. केंद्रसरकारनं यापुर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्कारानं गौरवलेलं आहे. सोबत वेगवेगळ्या संस्थामध्ये त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. भारतामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी आणण्यात राव यांची महत्त्वाची भुमिका होती. जगभरातल्या मानाच्या तब्बल 40 युनिव्हर्सिटीजनी राव यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.

close