लोकलचा दरवाजा अडवणा-यांवर कारवाई

February 9, 2009 6:58 AM0 commentsViews: 5

9 फेब्रुवारी मुंबईलोकलचा दरवाजा अडवून ठेवणा-यांवर आता पोलीस कडक कारवाई करणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर पुशर सुविधाही पुरवणार आहेत. विशेषतः विरारच्या लोकल्सवरून मोठाच गदारोळ होतो. त्यासाठी बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचवर पुशर्स ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी केली आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे व्यवस्थापनाविरोधात बोरिवलीकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं होतं. या प्रश्नावर शिवसेनेनं बोरिवलीत रेल्वे परिषद आयोजित केली आहे. शिवसेनेचे मुंबईतील खासदार, आमदार तसंच सगळे नेते या परिषदेला उपस्थित आहेत. खासदार, तसच नेते इथे दाखल झाले आहेत. शिवसेनेनं स्टेशन मास्टरांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन चालू केलं आहे.

close