बाळासाहेबांना दिग्गज नेत्यांची आदरांजली

November 17, 2013 3:40 PM0 commentsViews: 227

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. आजुनही त्यांच्या आठवणीने अनेक शिवसैनिकांचे डोळे पाणावतात. दादरमधल्या शिवाजी पार्क इथे मुंबई महापालिकेने उभारलेल्या स्मृतिउद्यानात शिवसैनिक अभिवादन करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थोड्या वेळापूर्वी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेबांचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्मृतिउद्यानावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. छगन भुजबळ,समीर भुजबळ,पंकज भुजबळ, रामदास आठवले यांनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही स्मृतिउद्यानाच्या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत.

याशिवाय सकाळपासूनच शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात येऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे ज्येष्ठ नेतेही शिवाजी पार्कवरच्या स्मृतिस्थळाला श्रध्दांजली वाहत आहेत. बाळासाहेबांच्या अंतयात्रेत शिवसैनिक आणि नागरिकांनी जे विराट दर्शन शिवाजी पार्कवर दिसले त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलीय, बर्‍याच वाद विवादानंतर शिवाजी पार्कवर महापालीकेने तयार केलेल्या स्मृतिस्थळावर मुख्यकार्यक्रम होणार आहे.

close