व्यंगचित्रकारांनी वाहिली बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

November 17, 2013 4:01 PM0 commentsViews: 417

बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतीदिनी देशभरातल्या नामवंत व्यंगचित्रकारांनी बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी देशभरातल्या नामवंत व्यंगचित्रकारांनी चितारलेल्या बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. प्रबोधन संस्थेने हा ठाकरे उत्सव आयोजित केला होता. या पुस्तकात एकूण 53 व्यंगचित्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखासह चार लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातली चित्रे सध्या 17 तारखेपर्यंत गोरेगाव इथे सुरू असलेल्या ठाकरे उत्सवादरम्यान पाहायला मिळणार आहे.

close