सचिनला भारतरत्न ,मग ध्यानचंद यांना का नाही?- तिवारी

November 18, 2013 4:07 PM2 commentsViews: 1252

jdu shivanad18 नोव्हेंबर :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला त्याला निरोपाची भेट म्हणून भारत सरकारने देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान जाहीर केला. सचिनला भारतरत्न सन्मान जाहीर झाल्यामुळे देशभरात पुन्हा दिवाळी साजरी झाली. मात्र या आनंदोत्सवाला दोन दिवस उलटत नाही तोच राजकीय नेत्यांनी ‘भारतरत्न’वरुन वाद उकरून काढलाय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर केल्याबद्दल जेडीयूचे नेते शिवानंद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केलीये. सचिन फक्त पैशांसाठी खेळला असा आरोप त्यांनी केला.

त्याच्याऐवजी हॉकीपटू ध्यानचंद यांना भारतरत्न मिळायला हवं होतं. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. 1928 ते 1936 च्या काळात ध्यानचंद यांनी देशाला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. 1936 साली जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने तर ध्यानचंद यांची खेळी पाहून आपल्या जर्मन फौजेत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. अशा या महान खेळाडूला भारतरत्न न देता सचिनला भारतरत्न का देण्यात आलं असा प्रश्न शिवानंद तिवारी यांनी उपस्थित केला.

अशीच मागणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलीये. तर तेलुगू देसम पक्षांनं त्यांच्या पक्षाचे संस्थापक एन.टी. रामाराव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तर यात भाजपही मागे नाही. भाजपने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आज या मागणीला अपारंपरिक ऊर्जामंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पाठिंबा दिलाय.

  • Rohit Vinayak Bhosale

    sachin has never won any single cup by one hand. instead we see that vishwanathan aanand has won number of cups for india.. we should think for him

  • RAHUL NIKAM

    100 koti janata jevha apeksha gheun basate ani tyasamor tyanchi apeksha gham galun purn karato na tyacha ha sanman ahe ……… tumhala jamel ka ……. tumhi tar mandhana 10 pat khaun 5 varshat purn karat nai…….tula nai samajanar mitra tu kharach ase bolun tuzi aukat dakhavali……..ya deshat vad honar nait asa kotach vishay nai………… tumhi media ya goshtila jababdar ahat…. rahulnikam999@gmail.com

close