ग्लोबल मार्केटमध्ये तेजी

February 9, 2009 8:33 AM0 commentsViews: 5

9 फेब्रुवारीएशियन मार्केटमध्ये ओपनिंगपासूनच चांगला उत्साह आणि तेजी दिसतेय. त्यांच्याकडे शेअर्सखरेदीही जोमात सुरू आहे. हा सर्व अमेरिकन मार्केटकडून आलेला ट्रेन्ड आहे. अमेरिकन मार्केट्सही बँकिग सेक्टरला अपेक्षित असलेल्या बेलआऊट पॅकेजची वाट पाहत आहेत आणि त्यामुळे तिथंही मार्केट इंडेक्स तेजीच्या उंबरठ्यावर आहेत.बिझनेस न्यूजबिझनेस स्टॅन्डर्डमध्ये सुभिक्षाच्या ऑडिट बुक्सचं आता पुनर्परीक्षण केलं जाणार आहे. त्यांची बँक आयसीआयसीनं ही मागणी केली आहे.म्युच्यअल फंडावरचा एंट्री आणि एक्झिट लोड फी काढून टाकण्याबाबत सेबी विचार करतंय.तहलका प्रकरणातल्या फर्स्ट ग्लोबल कंपनीनं त्यांचे रेकॉर्ड्स स्वच्छ असल्याचं सिद्ध करण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली आहे. इकॉनॉमिक टाईम्स आणि त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच छान बातमी दिली आहे. मार्केटमध्ये होम लोनचे रेट कमी होत आहेत आणि ग्राहकांना हा फायदा देण्यात विशेषत: सरकारी बँका आघाडीवर असल्याचं इटीनं म्हटलंय.मिंटमध्ये पहिल्याच पानावर निवडणुकांच्या तयारीची बातमी आहे. सर्व पक्ष प्रचारासाठी काय मुद्दे घेतील असं काहीसं विश्लेषण करणारी ही बातमी आहे.

close