नवी मुंबई-पुणे विमानतळाला शेतकर्‍यांचा विरोध

November 18, 2013 5:59 PM0 commentsViews: 622

navi mumbai airport18 नोव्हेंबर : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्राने हिरवा कंदील दिलाय. मात्र, या प्रकल्पांना स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध सुरू झालाय.

नवी मुंबईत पुनर्वसन होणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या मागण्या वाढवल्यात. तर पुण्यातीलं विमानतळ खेड तालुक्यात कनेरसर या गावाच्या हद्दीत होणार आहे. तिथल्या गावकर्‍यांनीही या विमानतळाला विरोध सुरू केलाय. ‘सेझ’मध्ये विमानतळाला विरोध कायम आहे. आम्ही ‘सेझ’मध्ये विमानतळ होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा दहन करून निषेध नोंदवला.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यातल्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला होता.

नवी मुंबई विमानतळ – विरोधातली गावं
– ओवळा, वरचा ओवळा, वाघोलीवाडा, पारगाव, कोल्ही, कुंडेवाल, डुगी, भंगारपाडा

गावकर्‍यांची मागणी
22.5 ऐवजी 35 टक्के विकसित जमीन हवी
6.5 कोटी रुपये प्रति हेक्टर दर हवा

close