केजरीवाल यांच्यावर फेकली काळी शाई

November 18, 2013 7:52 PM0 commentsViews: 1339

kejrival ink18 नोव्हेंबर : आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यावर एका भाजपच्या कार्यकर्त्याने काळी शाई फेकलीय. नचिकेत वाल्हेकर असं तरूणाचं नाव आहे. त्याने आपण भाजपचा कार्यकर्ता आणि अण्णांचा समर्थक  असल्याचं सांगितलंय.

आज संध्याकाळी दिल्लीत आम आदमीची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी नचिकेत वाल्हेकर यांने ‘अण्णा हजारे झिंदाबाद’ च्या घोषणा देत पत्रकार परिषदेत गोंधळ घातला आणि प्रशांत भूषण आणि केजरीवाल यांच्या काळी शाई फेकली. प्रशांत भूषण आणि केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांची फसवणूक केली असा आरोप नचिकेतने केला.

आपण राळेगणसिद्धी येथून आलोय. अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं यातून यांनी आपला पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन करते समयी अण्णांनी आपलं नाव न वापरण्याचा सल्ला दिला होता. पण या लोकांनी अण्णांचं नाव वापरलं त्यांची फसवणूक केलीय असा आरोपही या तरूणाने केला. आम आदमीला मिळालेल्या निधीबाबत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्यावेळी हा प्रकार घडला. मात्र असे प्रयत्न अनेक जण करतच असतात त्याकडे फारस लक्ष देण्याची गरज अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली.

 

close