माझ्या विधानाचा विपर्यास -राव

November 18, 2013 6:13 PM0 commentsViews: 404

cnr rao18 नोव्हेंबर : ‘मूर्ख राजकारणी वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष करतात’ असं विधान करणारे भारतरत्न सी.एन.आर. राव यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचा खुलासा केलाय.

आज सकाळी पत्रकार परिषदेत आपण दुसर्‍या कशाला तरी मुर्खपणाचे म्हटलं होतं पण त्याचा विपर्यास केला गेला असा खुलासा राव यांनी केला. रसायनशास्त्र डॉ.सी.एन.आर. राव यांना शनिवारी भारतरत्न जाहीर झालाय. सन्मान जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले.

मूर्ख राजकारणी वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे राव हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. संशोधनासाठी अधिक साधनसंपत्तीची तातडीची गरज आहे. पण, राजकारणी ते पुरवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. वैज्ञानिक प्रगतीत भारत चीनच्या मागे पडण्यासाठी भारत सरकारच जबाबदार असल्याचंही ते म्हणाले होते.

close