लवासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

November 18, 2013 6:06 PM0 commentsViews: 535

Image lavasa_city_300x255.jpg18 नोव्हेंबर : कस्तुरीरंगन समितीच्या पश्चिम घाट अहवालानंतर केंद्रीय पर्यावरण खात्यानं पश्चिम घाटात असलेल्या 6 राज्यातल्या संवेदनशील क्षेत्रात बांधकाम करायला बंदी घातलीय.

या बंदी क्षेत्रात लवासा प्रकल्पातील 17 पैकी 13 गावं येत असल्यानं आता 80 टक्के अपूर्ण लवासा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय असा दावा पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलाय.

तसंच सध्या लवासा प्रकल्प ज्या 2000 हेक्टरवर उभा आहे तिथं कोर्टाची स्थगिती असूनसुद्धा बांधकामं सुरू आहेत यालाही सुनीती सु.र. यांनी आक्षेप घेतलाय. पोलिसांच्या दंडेलशाहीखाली स्थानिकांकडून जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. दरम्यान, पर्यावरण खात्याचा आदेश लवासाला लागू होत नाही असा दावा लवासानं एका पत्रकाद्वारे केलाय. दोन हजार हेक्टरवरच्या बांधकामासाठी लवासा ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून 9 नोव्हेंबर 2011 ला परवानगी मिळाली आहे, असं लवासाचं म्हणणं आहे.

close