सापाच्या विषाची तस्करी, 2 कोटींचं विष जप्त

November 18, 2013 10:26 PM0 commentsViews: 219

18 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात सापाच्या विषाची तस्करी सुरु असल्याचं समोर आलंय. यासंबंधी कोल्हापूर पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केलीय. या कारवाईत सुमारे 2 कोटी रुपयांचं सापाचं विष जप्त करण्यात आलंय. सापाचं विष विकण्यासाठी काही लोक हे कागलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तस्करी करणार्‍या लोकांना अटक केलीय. दरम्यान,या कारवाईत अटक केलेले 2 नागरिक हे गोव्यातले असल्यानं विषाच्या तस्करीची पाळमुळे ही गोव्यापर्यंत पोहोचल्याचंही स्पष्ट होतंय.

close