ऊसदरवाढ आंदोलनामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ

November 18, 2013 7:00 PM0 commentsViews: 135

18 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या ऊसदर आंदोलनाचा फटका शेतकर्‍यांनाच नाही तर बीड, अहमदनगर जिल्ह्यातून येणार्‍या ऊसतोड कामगारांनाही बसतोय. एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे हाताला काम नाही, तर दुसरीकडे अजून कारखाने सुरू झाले नाहीत. यामुळे ऊस तोड कामगारांवर मोठं संकट कोसळलंय. सरकार दरवर्षी मजुरीत तुटपुंजी वाढ करून कामगारांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप ऊस तोड कामगारांनी केलाय. बीड जिल्ह्यात 4 लाख ऊस तोड कामगार आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. त्यामुळे हे कामगार हंगाम झाल्यावरही इतर कामासाठी गाव सोडून गेले होते. यंदा हंगाम सुरू झाला, पण साखर कारखाने मात्र अजूनही सुरूच झालेले नाहीत. सरकारनं ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा. नाहीतर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय.

close