मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यात रिक्षाचालक !

November 18, 2013 11:11 PM0 commentsViews: 2148

Image img_239812_cmonreccors_240x180.jpg18 नोव्हेंबर : ‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जातं नाही याचंच उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यात रिक्षा चालवतात…हे ऐकून कुणालाही धक्का बसेल. पण असा प्रकार पुण्यात घडलाय.

चक्क मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावानं ऑटो रिक्षाची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शिवसेनेचे विभागप्रमुख एकनाथ ढोले यांना प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीत हा प्रकार उघडकीला आला. एकनाथ ढोले यांनी आपल्या नातेवाईकांच्या ऑटोसाठी सहा नंबर मिळावा म्हणून अर्ज केला होता.

मात्र सहा नंबर हा दुसर्‍या व्यक्तीच्या ऑटोला देण्यात आल्यांचं प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं. जेव्हा हा नंबर नेमका कुणी घेतला या संबंधीचा अर्ज एकनाथ ढोले यांनी प्रादेशीक परिवहन विभागाकडे केला. तेव्हा हा MH 12 HC 6 या नंबरचा ऑटो राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नावे असल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केलीय.

close