ललित मोदी विरुध्दच्या अटक वॉरंटला स्थगिती

February 9, 2009 12:37 PM0 commentsViews: 1

9 फेब्रुवारी मुंबईमुंबई हायकोर्टानं आयपीएलचे संचालक ललित मोदी यांच्याविरुध्दच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. राजस्थान कोर्टानं जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होतं. त्याविरोधात मोदी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयचे 22 लाख रुपये हडप केल्याचाही आरोप आहे. येत्या 22 फेब्रुवारीला राजस्थान क्रिकेट संघटनेची निवडणूक आहे. त्यामुळे राजस्थान क्रिकेट संघटनेत आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.

close