जळगावात गुप्तधन सापडलं

November 19, 2013 2:54 PM0 commentsViews: 4054

jalagaon treser19 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशात शोभन सरकार या साधूला गुप्तधनाचं स्वप्न पडलं. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पण सोनं काही सापडलं नाही. आता जळगावमध्ये एका घराच्या पायाचं खोदकाम सुरू असताना अचानक गुप्तधन सापडलंय.

जुन्या जळगावात श्रीराम मंदिराजवळ एका घराचे नुतनीकरण सुरु होतं. त्याचं काम सुरू असताना पायाला अचानक एक पितळी हंडा सापडला. त्यानंतर गुप्तधन सापडल्याची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे या ठिकाणी जळगावकरांनी एकच गर्दी केली होती. जुन्या जळगावातले रहिवासी सुधाकर वाणी यांच्या जुन्या घराचे नुतनीकरणाचं काम सुरु आहे.

या हंड्यामध्ये शुद्ध चांदीची 61 पुरातन नाणी आढळून आली. घर मालक सुधाकर वाणी यांनी घटनेची माहिती ताबडतोब शहर पोलिसांना कळविली. तहसिलदार कैलास देवरे यांनी ही घटनास्थळाची पाहणी करुन ही 61 नाणी ताब्यात घेतली. घटनेची नोंद शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलीय.

close