केजरीवालांवर शाई फेकणारा भाजपचाच कार्यकर्ता

November 19, 2013 3:18 PM0 commentsViews: 839

nachiket_new19 नोव्हेंबर : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकणारा नचिकेता वाल्हेकर हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला असला तरी नचिकेताचं पालकत्व भाजपकडेच जातंय.

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो गांधींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी मुक्कामी होता. इतकंच नाही , तर नचिकेत हा 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार होता. नारायणगव्हाण या गावच्या नचिकेताला वाडेगव्हाण गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपनं तिकीट दिलं होतं. त्याला अत्यंत कमी मतं पडली होती.

अपक्ष उमेदवार विश्वनाथ कोरडे त्याच्या विरोधात विजयी झाले होते. केजरीवाल यांच्या शाई फेकल्यानंतर आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि अण्णा माझे गुरू आहे असा दावा नचिकेताने केला होता. या घटनेनंतर भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी घाईघाईने नचिकेता हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, नचिकेतावर आपला राग नाही, त्याला आपल्या विरोधकांनी पाठवलं असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय.

close