छत्तीसगडमध्ये दुसर्‍या टप्प्यात 75 टक्के मतदान

November 19, 2013 3:52 PM0 commentsViews: 151

Image img_189862_electionsutti_240x180.jpg19 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये आज दुसर्‍या टप्प्यातलं मतदान झालं. यावेळी तब्बल 75 टक्के मतदान झालंय. छत्तीसगडमध्ये यापूर्वी कधीही इतकं मतदान झालेलं नव्हतं. दुसर्‍या टप्प्यात माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पत्नी आणि मुलगा यांचं भविष्य मतदान यंत्रात बंद झालंय.

रायपूर, बिलासपूर आणि सरगुजा प्रांतात हे मतदान होतंय. यातला सरगुजा प्रांत हा नक्षलग्रस्त आहे. त्यामुळे इथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. 11 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी मतदान झालं होतं.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 67 टक्के मतदान झालं होतं. आता दुसर्‍या टप्प्यात किती मतदान होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसर्‍या टप्प्यात जोरदार मतदान होऊन त्याचा फायदा सत्ताधारी भाजपलाच होईल असा दावा मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केलाय.

close