घोलप सेनेबाहेर

February 9, 2009 2:39 PM0 commentsViews: 14

9 फेब्रुवारी फलटणशिवसेनेतून कानिफनाथ घोलपची हकालपट्टी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण इथल्या कानिफनाथ घोलप या गुंडानं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु आयबीएन लोकमतच्या या बातमीचा परिणाम असा झाला की शिवसेनेतून कानिफनाथ घोलपची हकालपट्टी करण्यात आली. कानिफनाथ घोलपच्या हकालपट्टीचे आदेश शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले. याबाबत शिवसेना आमदार निलम गो-हे यांनी सांगितलं, घोलपबद्दल पुरेशी माहिती नव्हती त्यामुळे त्याला प्रवेश दिला गेला. पण आता त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.कानिफनाथ घोलपवर एकट्या फलटण तालुक्यातच 28 गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या 2007मध्ये घोलपला तडीपार करण्यात आलं होतं. घोलपवर दरोडा, अपहरण आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला एका गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षाही झाली होती. एका दरोड्याच्या गुन्ह्यातून तो नुकताच सुटून बाहेर आला होता.

close