निवडणूक आयुक्त चावला पुन्हा संकटात

February 9, 2009 3:33 PM0 commentsViews: 1

9 फेब्रुवारी निवडणूक आयुक्त नवीन चावला हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जयपूरमध्ये जमीन खरेदीसाठी पदाचा गैरवापर केल्याचा चावला यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जयपूर कोर्टानं पोलिसांना दिलेत. भाजपच्या योगेंद्र सिंग तन्वर यांनी दोन वर्षांपूर्वी चावला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. जयपूरमधल्या संगनेर एअरपोर्टजवळची सहा एकर जमीन मिळवण्यासाठी चावलांनी आपल्या पदाचा वापर केल्याचं त्यात म्हटल होतं. चावला त्यावेळी पाँडीचेरीचे मुख्य सचिव होते.

close