पाकिस्तानची आडमुठी भूमिका

February 9, 2009 4:40 PM0 commentsViews: 2

9 फेब्रुवारी मुंबई हल्ल्याबाबत भारतानं दिलेल्या पुराव्याचा अहवाल पाकिस्तान मंगळवारी देण्याची शक्यता आहे. या पुराव्यावर पाकच्या केंद्रीय तपास यंत्रणेनं अहवाल तयार केलाय. त्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. आयएसआयचे प्रमुख, तिन्ही दलांचे प्रमुख यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य याला उपस्थित होते. अनेक तासांच्या चर्चेनंतर हल्ल्याची जबाबदारी झटकण्याचा पाकचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. मुंबई हल्ल्याची जबाबदारी टाळण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न दिसतो.उच्चस्तरीय बैठकीनंतर पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेल्या निवेदनावरून याचा अंदाज येतो. मुंबई हल्ल्याबाबत भारतानं दिलेले पुरावे अपुरे असल्याचं पाकिस्ताननं या निवेदनात पुन्हा एकदा म्हटलंय. भारतानं हल्ल्याचे आणखी पुरावे द्यावेत, अशी मागणी पाक करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकनं या हल्ल्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्ये शिजला नाही, असं पाकचं म्हणणं आहे. हा कट ऑस्ट्रिया आणि दुबईत शिजल्याचा जावईशोध पाकनं लावलाय. केवळ या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या भूमीचा वापर केल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर पाकमध्येच कारवाई केली जाईल, असं या निवेदनात म्हटलंय. मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तान भारताकडे करण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलंय. पाकिस्तान हा अहवाल मंगळवारी भारताला देणार असल्याचं समजतंय. दरम्यान,कसाबला मदत केल्याप्रकरणी पाकनं तिघांना अटक केल्याची माहिती मिळालीय.

close