नांदेड पॅसेंजर ट्रेनवर दरोडा

February 10, 2009 5:13 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारी औरंगाबादनांदेड-दौंड पॅसेंजर ट्रेनमध्ये रात्री दरोडा घालण्यात आला. यावेळी दोन प्रवाशांना दरोडेखोरांनी चालत्या गाडीमधून फेकून दिलं. मात्र दरोडेखोरांनी गाडीतून फेकून दिलेले दोघेजण सुदैवानं वाचले आहेत. ही घटना लासूर स्टेशनजवळ घडली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या दोघां जखमी प्रवाशांना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरोडेखोरांनी गाडीतल्या महिलांच्या अंगावरील सोनंही लुटून नेलं. तसंच रोख रक्कमही लुटण्यात आली आहे. चोरट्यांनी रेल्वेप्रवाशांकडून 7 तोळे सोनं आणि 10 हजार रुपये लुटले.